
अमेरिकास्थित इनोवेक्चर चा पुण्यात ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटरचा विस्तार; Nexio सोबत धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत AI, डेटा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि IT ऑपरेशन्ससाठी पुणे बनेल महत्वाचे इंजिनिअरिंग केंद्र
पुणे: अमेरिकास्थित तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग सेवा कंपनी इनोवेक्चर (Innovecture) ने पुण्यातील आपल्या ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटरचा (GEC) विस्तार करत अमेरिकास्थित पेमेंट्न्स टेक्नॉलॉजी कंपनी नेक्सिओ (Nexio) सोबतची धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील हे केंद्र नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञानविषयक गरजांना पाठबळ देण्यासोबतच इंजिनिअरिंग क्षमता, तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि विशेष कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

इनोवेक्चर आणि नेक्सिओ यांच्यातील तंत्रज्ञान सहकार्याची सुरुवात २०२४ मध्ये झाली. गेल्या दोन वर्षांत हे सहकार्य केवळ तंत्रज्ञान सेवा पुरवण्यापुरते मर्यादित न राहता नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञान प्राधान्यक्रमांना पाठबळ देणाऱ्या व्यापक इंजिनिअरिंग भागीदारीत विकसित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेक्सिओ पुण्यातील इनोवेक्चर GEC च्या माध्यमातून भारतातील आपली तंत्रज्ञान उपस्थिती वाढवत आहे. या विस्तारामुळे नेक्सिओला नव्या तंत्रज्ञानविषयक संधींवर अधिक वेगाने काम करता येणार असून, विशेष कौशल्य असलेल्या इंजिनिअरिंग मनुष्यबळाचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञान गरजांनुसार आपल्या तंत्रज्ञान संस्थेचा विस्तार अधिक लवचिकपणे करण्याची क्षमता मिळणार आहे.

सध्या पुण्यातील इनोवेक्चरची इंजिनिअरिंग टीम डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, AI आणि डेटा, अॅप्लिकेशन मॉडर्नायझेशन, क्वालिटी इंजिनिअरिंग, अॅप्लिकेशन सपोर्ट आणि IT ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये नेक्सिओसोबत काम करत आहे. नेक्सिओच्या तंत्रज्ञान आणि उत्पादनविषयक रोडमॅपमध्ये होत असलेल्या विस्तारानुसार पुण्यातील या क्षमतांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. पुण्यातील GEC च्या माध्यमातून नेक्सिओला इनोवेक्चरचे इंजिनिअरिंग कौशल्य, विशेष तज्ज्ञ मनुष्यबळ, तंत्रज्ञान क्षमता आणि कार्यपद्धती यांचा लाभ घेता येणार आहे. यामुळे नेक्सिओच्या जागतिक प्राधान्यक्रमांशी सुसंगत अशा इंजिनिअरिंग क्षमतेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करता येणार आहे.

या भागीदारीच्या पुढील टप्प्यात नेक्सिओचे वरिष्ठ अधिकारीही भारतातील टीमसोबत अधिक जवळून काम करणार आहेत. नेक्सिओचे COO जस्टिन ब्राउन आणि इंजिनिअरिंगचे व्हाइस प्रेसिडेंट वेई लिऊ भारत दौऱ्यावर असून, ते पुण्यातील इंजिनिअरिंग टीमसोबत संवाद साधत धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करणार आहेत. या भेटीमुळे अमेरिका आणि भारतातील टीम्समधील समन्वय वाढण्यासोबतच नवकल्पना, अंमलबजावणी आणि नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञानविषयक प्राधान्यक्रमांवर दोन्ही संस्थांचा संयुक्त भर अधिक मजबूत होणार आहे.
पुण्यातील GEC नेक्सिओच्या जागतिक इंजिनिअरिंग टीमचा विस्तार
पुण्यातील ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटरची उभारणी नेक्सिओच्या विद्यमान तंत्रज्ञान टीमचा विस्तार म्हणून करण्यात आली आहे. अमेरिका आणि भारतातील इंजिनिअरिंग टीम्सना समान उत्पादन उद्दिष्टे, तंत्रज्ञानविषयक प्राधान्यक्रम आणि नवकल्पना उपक्रमांभोवती एकत्र आणणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या केंद्रात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटा, AI, ऑटोमेशन, क्वालिटी इंजिनिअरिंग, अॅप्लिकेशन मॉडर्नायझेशन आणि IT ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रांतील कौशल्य एकत्र आणले जाणार आहे. यामुळे नेक्सिओला आपल्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता उपलब्ध होणार असून, इंजिनिअरिंगच्या विविध कामांमध्ये AI आणि ऑटोमेशनचा वापरही वाढवता येणार आहे. या मॉडेलमध्ये नेक्सिओचे उत्पादन आणि पेमेंट्स् क्षेत्रातील कौशल्य, तसेच इनोवेक्चरचे इंजिनिअरिंग मनुष्यबळ, तंत्रज्ञान क्षमता आणि कामकाजाचा अनुभव यांचा समन्वय साधला जात आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांच्या टीम्स एकत्रितपणे काम करत असताना नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञान धोरणाशी आवश्यक तो समन्वय कायम राहणार आहे. दोन वर्षांच्या तंत्रज्ञान सहकार्याला व्यापक इंजिनिअरिंग भागीदारीचे स्वरूप पुण्यातील GEC हा इनोवेक्चर आणि नेक्सिओ यांच्यात गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या संबंधांचा पुढील टप्पा आहे. या कालावधीत दोन्ही संस्थांनी विश्वास, सहकार्य, इंजिनिअरिंगमधील गुणवत्ता आणि सामायिक जबाबदारी यांवर आधारित मजबूत कार्यसंबंध निर्माण केले आहेत. आता ही भागीदारी अधिक व्यापक इंजिनिअरिंग क्षमतेत रूपांतरित होत असून, नेक्सिओच्या दीर्घकालीन वाढीला आणि तंत्रज्ञानातील परिवर्तनाला पाठबळ देण्याचा उद्देश आहे. पुण्यातील GEC मुळे नेक्सिओला पेमेंट्स् टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, AI, डेटा, क्वालिटी इंजिनिअरिंग आणि अॅप्लिकेशन मॉडर्नायझेशन या क्षेत्रांमध्ये आपल्या क्षमतांचा सातत्याने विस्तार करता येणार आहे.
त्याचवेळी, नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञान आणि उत्पादनविषयक प्रवासात इनोवेक्चरला अधिक व्यापक भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. गिरीश राव, सीईओ-इंडिया, इनोवेक्चर म्हणाले, “नेक्सिओसोबतची आमची दृष्टी भारतात केवळ इंजिनिअरिंग क्षमता उभारण्यापुरती मर्यादित नाही. नेक्सिओसाठी व्यावसायिक मूल्य निर्माण करण्यासाठी टॅलेंट, तंत्रज्ञान, डोमेनविषयक कौशल्य आणि नवकल्पना यांना एकत्र आणणारी जागतिक इंजिनिअरिंग क्षमता उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही या भागीदारीचा मजबूत पाया तयार केला आहे. पुण्यातील GEC हा त्याच प्रवासाचा पुढील टप्पा असून, नेक्सिओची उत्पादन आणि तंत्रज्ञानविषयक दृष्टी इनोवेक्चरच्या इंजिनिअरिंग कौशल्य, टॅलेंट आणि तंत्रज्ञान क्षमतेसोबत जोडली जात आहे.” ते पुढे म्हणाले, “यशस्वी ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटर हे केवळ सेवा देणारे केंद्र नसावे, तर ते क्लायंटच्या तंत्रज्ञान संस्थेचा अविभाज्य भाग असावे. त्याच्या उत्पादनांशी, संस्कृतीशी, प्राधान्यक्रमांशी आणि भविष्यातील उद्दिष्टांशी त्याचा थेट संबंध असणे आवश्यक आहे. नेक्सिओसोबत आम्ही याच पद्धतीचे मॉडेल उभारत आहोत. नेक्सिओच्या जागतिक इंजिनिअरिंग आणि नवकल्पना प्रवासात पुण्याला महत्त्वाचे स्थान मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.” नेक्सिओचे COO जस्टिन ब्राउन म्हणाले : नेक्सिओचे इंजिनिअरिंगचे व्हाइस प्रेसिडेंट वेई लिऊ म्हणाले, या विस्तारित भागीदारीमुळे नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञान संस्थेला पाठबळ देणारे धोरणात्मक इंजिनिअरिंग केंद्र म्हणून पुण्याची भूमिका अधिक मजबूत होत आहे. त्याचबरोबर, दोन्ही संस्थांना सहकार्याचा विस्तार करण्यासाठी, इंजिनिअरिंग क्षमता वाढवण्यासाठी आणि नेक्सिओच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पनांना अधिक वेग देण्यासाठी एक मजबूत आणि विस्तारक्षम पाया मिळणार आहे.

