
छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विलासभाऊ पांगारकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे नाना याची भेट घेतली.
यावेळी १२ ते २२ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव रथ यात्रा व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंहस्थाचे प्राचीन स्थान असलेल्या कावनाई येथे ध्वजारोहण समारोह कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी छावा भारत क्रांती मिशन चे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, संघटक परमेश्वर नलावडे पाटील आदी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

