
( भोर- चंद्रकांत जाधव )… दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके (माजी शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री, भोर संस्थान) यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आणि ६५ व्या स्मृतिदिनानिमित्त** भोर तालुक्यातील आपटी येथे त्यांच्या स्मृतीस्तंभाजवळ मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
बाळासाहेब साळुंके यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे, गोविंदराव रणखांबे (निवृत्त सहसचिव), उद्योजक राजेंद्रभाऊ कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, हनुमंत गायकवाड, बबन गायकवाड, विजय गायकवाड, मोहन सातपुते, मारुती सातपुते, आनंदा सातपुते, सुनील धर्माजी मोरे, सतीश गायकवाड तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष काश्यपदादा साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब साळुंके यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात त्यांच्या कार्याविषयी आदर व कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते.

