
भोर- चंद्रकांत जाधव..भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष संपत गणपत दरेकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली.धावडी-बाजारवाडी ता. भोर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ‘अ’ वर्ग गटातून दरेकर यांना प्रतिनिधित्व देण्यात आले.
जिल्हा बँकेच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या पाच वर्षांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ही निवड करण्यात आली आहे.बाजारवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात शनिवार दि. १२ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दरेकर यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव करण्यात आला.
या वेळी संस्थेचे सचिव विजय चव्हाण,उपाध्यक्ष रामचंद्र गोळे,संचालक यशवंत मानकर,मारुती चव्हाण,बबन चव्हाण,यमुना खोपडे,शालन राऊत,अकुंश राऊत, संदीप शिंदे उपस्थित होते.

