
भोर-चंद्रकांत जाधव.. धकाधकीच्या जीवनात आजारांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यांच्या मोफत आरोग्य तपासणी होऊन शिबिराच्या माध्यमातून औषध उपचार केले जातात.त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटले जातात. तेव्हा अशा मोफत आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जि.प सदस्या स्वरूपा थोपटे यांनी केले.
भोर येथील माजी उपनगराध्यक्ष संजय जगताप आणि मित्रपरिवार यांच्याकडून भरविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवार दि.२२ जि.प.सदस्य थोपटे बोलत होत्या.आरोग्य शिबिरात २१० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यात हृदयविकार,मधुमेह,डोळ्यांची तपासणी,स्त्री विकार,मोफत मोतीबिंदू तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,हाडांचे आजार,त्वचारोग मोफत, कान – नाक घसा आदींवर उपचार,दातांची तपासणी,रक्त तपासणी,जनरल तपासण्या करण्यात आल्या.आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यकाळात आरोग्य शिबिरे भरवून गोरगरीब रुग्णांच्या विविध आजारांच्या तपासण्या करून उपचार करणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जगताप म्हणाले.यावेळी माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,युवानेते पृथ्वीराज थोपटे,पं.स.सदस्य सुषमा चव्हाण,डॉ.ओंकार थोपटे,उपनगराध्यक्ष ॲड.जयश्री शिंदे,माजी उपनगराध्यक्ष संजय जगताप,गणेश पवार,गटनेते अमित सागळे,नगरसेवक सुमंत शेटे,जयवंत शेटे,सचिन तारू, रेणुका बदक,स्नेहल घोडेकर उपस्थित होते.

