
गुरुपौर्णिमेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन करून घेण्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहर यांच्या वतीने आज संविधान चौक, अप्पर बिबवेवाडी येथे “जोडेमारो आंदोलन” करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान संबंधितांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित लोकप्रतिनिधी वर्षा साठे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनाचे आयोजक मच्छिंद्र (अण्णा) बनसोडे (पुणे शहर उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट) होते.
यावेळी रमेशभाऊ कांबळे, जावेदभाई शेख, सदाभाऊ शिंगे, हणमंत निगडळी, सुनील होसमनी, अजिज तांबोळी, बाबू माणिकडे, संतोष हुसगे तसेच अमोल परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

