
(भोर-चंद्रकांत जाधव) भोर तालुक्यातील एका वडार समाजाच्यावर होणारा अन्याय यासाठी असलेले सुरू असलेले उपोषण अखेर तीन दिवसानंतर मा.आ संग्राम थोपटे व वडार एकता फाउंडेशनचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे यांना तहसीलदार भोर यांनी लेखी पत्र दिल्यामुळे स्थगित करण्यात आले आहे.
भोर येथील नंबर १४२ मधील त्रुटी पूर्णपणे बंद करावी समाजाच्या या दीर्घायूमुळे 20 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आमच्या दगड फोडीच्या व्यवसायासाठी( ८ सप्टेंबर ) पासून वडार बांधव उपोषणासाठी बसले आहेत यांचा पत्रव्यवहार संबंधित ठिकाणी झालेला आहे दीपक छगन धोत्रे व छगन तुकाराम धोत्रे (रा.भोर)यांनी शासनाला वेळोवेळी कळवले आहे परंतु योग्य ती कारवाई होत नसल्याने हे सर्वजण कुटुंबीयांसमवेत (दि-८)पासून उपोषणाला बसले होते.
याची दखल घेत भोरचे मा.आ संग्राम थोपटे व वडार एकता फाउंडेशन राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन भोर तहसील कार्यालयाच्या समोरील उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जोपर्यंत धोत्रे यांचा प्रश्न मार्गी लागत नाही व चुकीचे श्रीनाथ वेताळ यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही. तो पर्यंत उपोषण सोडत नाही.
उपोषण स्थळी मा. आ.संग्राम थोपटे व विजय गोरे यांनी भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याशी संपर्क साधून यांना न्याय द्या असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा (१६ सप्टेंबर) रोजी जिल्हा खनिज कर्म अधिकारी पुणे यांच्याशी बैठकीचे आयोजन केले असे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तीन दिवसांचे उपोषण सोडण्यात आले.

